` श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना बद्दल विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे 'FAQ

` श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना बद्दल विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे ' FAQ

प्रश्न १ - "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" ची माहिती कुठे भेटेल?
उत्तर - "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना "लाभ घेण्यासाठी योजनेच्य वेबसाईटवर जाऊन माहिती वाचुन घ्यावी लागेल. व अधिक माहितीसाठी ऑफिस नंबर संपर्क साधावा.

प्रश्न २- "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" लाभ घेणयासाठी काय करावे लागेल?
उत्तर - "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना " लाभ घेण्यासाठी ऑनलाईन सभासद नोंदणी (अकाऊंट ओपन ) केले पाहिजे.

प्रश्न ३- "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मधील नियमित देणगी म्हणजे काय?
उत्तर - "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना " मधील नियमित देणगी ही सभासद असेल पर्यंत भरणे आवश्यक आहे. भारण्यात अलेली देणगी रक्कम सभासद रद्द केल्यानंतर देण्यात येते. नियम व अटी नुसार 

प्रश्न ४- "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मधील नियमित देणगी जमा नसेल तर?
उत्तर - "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना " मधील नियमित देणगी ही सभासद जमा करत नसेल तर योजनेचा लाभ दिला जात नाही.

प्रश्न ५- ऑनलाईन सभासद नोंदणी केली की लाभ ( कर्ज ) कधी मिळणार?
उत्तर - श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना मध्ये ऑनलाईन सभासद नोंदणी केली म्हणजे सभासद झाले ( अकाऊंट ओपन झाले ) लाभ ( कर्ज ) मिळवण्यासाठी योजनेच्या प्रकारानुसार लाभ ( कर्ज ) डॉक्युमेंट ऑफिसला कुरिअर करा किंवा स्वतः जमा करा.

प्रश्न ६- लाभ ( कर्ज ) कधी मिळणार?
उत्तर - योजनेच्या प्रकारानुसार योजनेचा नोंदणीकृत सभासद( अकाऊंट धारक ) लाभ घेण्यासाठी ( कर्ज  घेण्यासाठी ) डॉक्युमेंट ऑफिसला कुरिअर करा किंवा स्वतः जमा करा.

प्रश्न ७- लाभ रक्कम ( कर्ज रक्कम ) किती मिळणार?
उत्तर - योजनेच्या प्रकारानुसार व दररोज नियमीत  देणगी रक्कम,डॉक्युमेंट व ईतर या लाभाची रक्कम ( कर्जची रक्कम ) ठरवली जाते.

प्रश्न ८- लाभची रक्कम ( कर्जची रक्कम ) कोण देणार?
उत्तर - लाभची रक्कम ( कर्जची रक्कम ) योजनेच्या प्रकारानुसार असेल. 
       म्हणजे बिनव्याजी स्वरुपात लाभ घेयचा असेल तर "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत लाभची रक्कम ( कर्जची रक्कम ) दिली जाते.
     व्याज परतवा स्वरुपात लाभ असेल तर श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना नोंदणीकृत सभासद यांनी कोणत्याही बँक, पतसंस्था, बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था याच्याकडून व्यवसायिक कर्ज घेऊन कर्जावरील १२% व्याज "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" मार्फत सभासद याच्या बँक सेवींग खात्यावर जमा होईल.(नियम व अटी नुसार)

प्रश्न ९- योजनेच्या व्याज परतवा प्रकारानुसार लाभ कोणत्या स्वरूपात दिला जाणार?
उत्तर - व्याज परतवा प्रकारानुसार योजनेचा लाभ हा सभासदांनी कोणत्याही बँक, पतसंस्था, बचत गट व ईतर नोंदणीकृत संस्था याच्याकडून व्यवसायिक कर्ज घेऊन कर्जावरील १२% व्याज योजने अंतर्गत सभासद याच्या बँक सेवींग खात्यावर जमा होईल.(नियम व अटी नुसार)

प्रश्न १०- व्याज परतवा स्वरुपात लाभ घेयचं असेल तर कोणत्या पद्धतीने घेता येईल?
उत्तर - नोंदणी दिनांक पासून 45 दिवसानंतर आर्थिक साह्य ( कर्ज )मागणी डॉक्युमेंट्स ऑफिसच्या पत्ता वर पोस्टाने /कुरिअर करावे.
आर्थिक साह्य ( कर्ज )मंजुरी प्रमाणपत्र देण्यात येते.प्रमाणपत्र बँक किंवा बचत गट जमा करुन कर्ज घेऊ शकतात.बँक चे किंवा बचत गट चे कर्ज मंजुरी प्रमाणपत्र "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" ऑफिस मध्ये जमा करुन १२% व्याज परतवा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न ११- योजना फसणुक तर नाही ना?
उत्तर - संस्था योजने अंतर्गत कोणाचीही फसणुक करत नाही व करणार पण नाही.पण आर्थकदृष्टया असह्य व्यक्तींना योजने अंतर्गत लाभ दिला जातो. योजने अंतर्गत लाभ दिला आहे अशा व्यक्तींना कर्ज भरण्यास संस्थे कडून वसुली करण्यात येते त्यामुळे योजने बदल वाईट प्राचार करतात.
लाभार्थी व्यक्तीकडून संस्थेस देण्यात येणारी वागणुक व अपशब्द ,यामुळे संस्था अशा व्यक्तींना त्याचं पद्धतीने वागणुक व अपशब्द वापरल्यामुळे ते व्यक्ती संस्थे / योजने बदल वाईट प्राचार करतात.
         त्या प्राचारचा संस्थेच्य/ योजनेच्या कामावर कोणताही फरक पडला नाही.पण गर्जाऊ व्यक्ती मनात योजनेबद्दल संभ्रम निर्माण होतो त्या मुळे योजनेचा लाभ घेण्यापासून दुर राहतात. बँक व ईतर संस्था (cibil) सिबिल खराब असल्यामुळे अशा व्यक्तींना कर्ज देत नाही पण अशा व्यक्तींना योजनेचा लाभ दिला जातो. सामाजिक काम म्हणून,संस्था नफा कमविण्यासाठी योजना राबवली जात नाही.

प्रश्न १२- सर्व समाजातील प्रत्येकासाठी ही योजना आहे का?
उत्तर - सर्व समाजातील प्रत्येकासाठी ही योजना आहे.

प्रश्न १३- मी महारष्ट्र मध्ये या ठिकाणचा रहिवासी आहे तर श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा लाभ घेऊ शकतो का ?
उत्तर - महारष्ट्र राज्यातील रहिवासी श्री छत्रपती आर्थिक साह्य योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न १४- "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" ऑफिस किंवा शाखा कुठे आहे?
उत्तर - "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" ऑफिस पत्ता योजनेच्या माहिती वेबसाईट वर उपलब्ध आहे व शाखा भविष्यात तालुका व जिल्हा पातळीवर चालु होतील.

प्रश्न १५- "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" केंद्र चालक म्हणजे काय?
उत्तर -  "श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना" केंद्र चालक म्हणजे योजनेची माहिती स्थानिक पातळीवर लोकांपर्यत पोहचवने व सभासद होण्यास इच्छुक व्यक्तींना नोंदणी करून देणे. नोंदणी शुल्क वगळता ईतर कोणताही आर्थिक व्यवहार आणि लाभ ( कर्ज )घेण्यासाठी डॉक्युमेंट जमा करुन नका. नोंदीकृत सभासद यांनी असे केल्यास यास संस्था/ योजना जिमेदार राहणार नाही.